२०१८ पासून सुरू झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांची शृंखला अद्याप सुरूच
पालघर, दि. १ : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का बसला. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.० मोजण्यात आली. अधिकाऱ्यांनी आज दि. रोजी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी दुपारी १२.५२ वाजता डहाणूपासून १३ किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त नसले तरी, पालघरच्या डहाणू भागात नोव्हेंबर २०१८ पासून अनेकदा असे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, जे बहुतेक दुंदलवाडी गावाभोवती केंद्रित आहेत.
