भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा २०० कोटी डोसचा टप्पा पार
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०० कोटी १६ हजाराच्या वर गेली आहे. त्यात १ लाख ७७ हजारापेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर ५ कोटी ५० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ११ कोटी ९ लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६ कोटी ४१ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.
राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी ५२ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर ४२ लाख ९७ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६९ लाख ५ हजारापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना ३९ लाख ८५ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.
