केंद्र सरकार म्हणतं देशातली ९७ टक्क्यापेक्षा जास्त शहरं हागणदारीमुक्त !
नवी दिल्ली: देशातली ९७ टक्क्यापेक्षा जास्त शहर हागनदारी मुक्त झाली आहे, असं केंद्र सरकारनं आज सांगितलं. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं आज शहरी स्वच्छ भारत मिशनचं सहाव वर्ष साजर केलं त्यानिमित्त स्वच्छता के छह साल, बेमिसाल याविषयावर वेबिनार आयोजित केलं.
स्वच्छतम भारत, स्वस्थतम भारत निर्माण करण्याचा दृढनिश्चय पुन्हा जागवण्याची ही वेळ आहे, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावेळी सांगितलं. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये १२ कोटीपेक्षा जास्त नागरीक सहभागी झाले, असं त्यांनी सांगितलं. ९७ टक्क्यापेक्षा जास्त शहर आता हागनदारी मुक्त झाली आहेत, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी यावेळी सांगितलं. देशात सध्या ६७ टक्के घनकचऱ्यावर प्रक्रिया होते, अशी माहिती त्यांनी दिली.
