सीबीएसईच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षाचं दुसरं सत्र आजपासून सुरु
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षाचं दुसरं सत्र आजपासून सुरु होत आहे. नेहमीच्या पद्धतीनं अर्थात ऑफलाईन होणारी ही परीक्षा १५ जूनला संपेल. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या अनिश्चितेच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा दोन सत्रात घ्यायचा निर्णय सीबीएसईनं गेल्या जुलैमध्ये घेतला होता. त्यानुसार या परीक्षाचं पहिलं सत्र यापुर्वीच झालं आहे.
