भारतातील एका नवोन्मेषी संशोधकाने देशाची मान अभिमानाने उंचावली
नवी दिल्ली, दि. २३: तिसर्या आसियान इंडिया ग्रासरूट्स इनोव्हेशन फोरममधील ग्रासरूट्स इनोव्हेशन स्पर्धेत ‘मॉडिफाइड वॉकर विथ अॅडजस्टेबल लेग्ज’ या नवोन्मेषासाठी भारताच्या शालिनी कुमारी यांना प्रथम पारितोषिक मिळाले. देशात अस्थिआजाराशी संबंधित उत्पादनांचे आघाडीचे उत्पादक, विस्को रिहॅबिलिटेशन एड्स, उद्योगांना हस्तांतरित केलेले हे तंत्रज्ञान ब्रिक आणि मोर्टार स्टोर्सच्या माध्यमातून तसेच देशातील सर्वसामान्यांसाठी ॲमेझॉन इंडीयाच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषा वरील समिती (सीओएसटीआय) कंबोडिया के अध्यक्ष तसेच किंगडम ऑफ कंबोडियाचे उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष मंत्रालयाचे (एमआयएसटीआय) महासंचालक माननीय डॉ. हुल सिंघेंग यांच्या हस्ते शालिनी कुमारी यांना पुरस्कार देण्यात आला. शालिनी कुमारी यांनी प्रथम पुरस्काराच्या रुपात 1,500 अमेरिकी डॉलर्सचे रोख पारितोषिक जिंकले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), भारत सरकार आणि राष्ट्रीय नवोन्मेष संस्था (एनआयएफ) – भारत यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषावरील आसियान समिती (सीओएसटीआय) द्वारे आयोजित तीन दिवसीय तिसऱ्या आसियान इंडिया ग्रासरूट्स इनोव्हेशन फोरमचा समारोप नोम पेन्ह, कंबोडिया येथे कंबोडीयाचे उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष मंत्री माननीय किट्टी सेथा पंडिता चाम प्रसिध यांच्या उपस्थितीत आज झाला. तीन दिवसीय प्रदर्शनात ९ देशांतील सुमारे १०० तंत्रज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

फिलीपिन्स आणि म्यानमारमधील नवसंशोधकांनी अनुक्रमे १००० अमेरीकी डॉलर्स आणि ५०० अमेरिकी डॉलर्सचे दुसरे आणि तिसरे पारितोषिक जिंकले आहे. नऊ राष्ट्राच्या एकूण ४५ ग्रासरूट नवोदितांनी या स्पर्धेत भाग घेतला.
| Grassroots Innovation Competition | ||
| 1st Prize | India – Ms Shalini Kumari | Modified walker with adjustable legs |
| 2nd Prize | Philippines – Mrs Meriam Bouquia | Multi purpose Fiber Stripper |
| 3rd Prize | Myanmar – Mr. Myo Thaw | GreenToddy’s Plamyra palm coconut |
| Student Innovation Competition | ||
| 1st Prize | Thailand – Ms. Napaschol Inthapan | ORA (Osteoarthritis Rehabilitation Assistant) |
| 2nd Prize | Thailand – Mr. Tanapat Charunworaphan | The HealthTech that keeps your heart in checked |
| 3rd Prize | Lao PDR – Mr. Phonsena Chanthavong | Intelligent boat for a cleaner river |
