भावना म्हात्रे यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्य म्हणून निवड
उरण, दि.२८(विठ्ठल ममताबादे): रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे व रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या सदस्यपदी खोपटे गावातील रहिवासी तथा महिला सामाजिक कार्यकर्त्या भावना कैलास म्हात्रे यांची महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. भावना कैलास म्हात्रे यांनी आजपर्यंत अनेक गोर गरिबांना मदत केली आहे. अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. शिवाय त्यांना प्रशासकीय कामाचाही अनुभव आहे. जनसंपर्कही दांडगा आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनातर्फे त्यांची नियुक्ती सदस्य पदी करण्यात आली आहे. या समितीत निवड झालेल्या त्या एकमेव महिला आहेत. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
