आता राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ‘मजीप्रा’ अंतर्गत मिळू शकणार दीड कोटींपर्यंतची कामे
मुंबई: राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत, दीड कोटीपर्यंतची कामं देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.
मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी, यासंदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
सद्यस्थितीत सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना, १५ लाख रुपयांपर्यंतची कामे मिळत होती.
चव्हाण यांनी राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नोंदणीकरणामध्ये वाढ करावी, अशी मागणीही केली होती. यासंदर्भातल्या प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.
