अरुण गोयल यांनी नवे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला
नवी दिल्ली, दि. २१: अरुण गोयल यांनी आज भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. सध्या नेपाळमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून काम पाहत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्तिशः अरुण गोयल यांना फोन करून त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले. निवडणूक आयोगामध्ये त्यांचे स्वागत करताना कुमार म्हणाले की, गोयल यांचा अफाट आणि वैविध्यपूर्ण प्रशासकीय अनुभव निवडणूक प्रक्रिया अधिक सर्वसमावेशक, सुगम्य आणि सर्वांना सहभागी करून घेण्याच्या आयोगाच्या प्रयत्नांना अधिक बळ देईल.
अरुण गोयल,आयएएस (पंजाब केडर – १९८५ तुकडी )
- इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठाच्या चर्चिल महाविद्यालयामधून विकास अर्थशास्त्रात डिस्टिंक्शनसह पदव्युत्तर पदवी
- एम.एस्सी. गणित
भारत सरकारच्या सेवेतील नेमणुका
- सचिव, अवजड उद्योग मंत्रालय २०२० – २०२२
(भारतातील ई-वाहन चळवळ महत्वपूर्ण वळणावर आणली)
- सचिव, सांस्कृतिक मंत्रालय २०१८ – २०१९
- एएस आणि एफए , कामगार आणि रोजगार मंत्रालय २०१७
- उपाध्यक्ष, दिल्ली विकास प्राधिकरण २०१५ – २०१६
- सहसचिव, वित्त मंत्रालय, महसूल विभाग २०१२ – २०१४
- सहसचिव, शहरी विकास मंत्रालय २०११
पंजाब सरकारमध्ये नेमणुका
- प्रधान सचिव (ऊर्जा आणि पाटबंधारे) २०१०
- प्रधान सचिव (गृहनिर्माण आणि शहरी विकास) २००७ – २००९
- सचिव, व्यय विभाग २००६
- व्यवस्थापकीय संचालक, पंजाब उद्योग आणि निर्यात २००३ – २००५
महामंडळ
- व्यवस्थापकीय संचालक, पंजाब वेअरहाऊसिंग महामंडळ २००१ – २००२
- जिल्हा निवडणूक अधिकारी/जिल्हाधिकारी, लुधियाना १९९५ – २०००
- व्यवस्थापकीय संचालक, चंदीगड औद्योगिक आणि पर्यटन विकास महामंडळ १९९४
- जिल्हा निवडणूक अधिकारी/जिल्हाधिकारी, भटिंडा १९९३
