केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आग्रह
त्रिपुरातल्या आगामी निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल, भाजपाच्या जागा आणि मतांचा टक्का दोन्हीमधे वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) ही संघटना दहशतवादी विचार आणि साहित्याचा प्रसार अशा देशविघातक कारवाया करीत असल्यामुळे तिच्यावर बंदी घातल्याचं ते म्हणाले. भाजपा सरकारने अनेक अतिरेकी संघटना आणि गटांशी समझोता करार केल्यानंतर ईशान्येकडच्या राज्यांमधे आता शांतता आहे असा दावा त्यांनी केला. सुमारे आठ हजार अतिरेकी शरणागती पत्करुन मुख्यप्रवाहात सामील झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्वी आंदोलनं, जाळपोळ, स्फोट अशा कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडच्या राज्यांमधे आता रस्ते, रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास होत आहे असं ते म्हणाले. त्रिपुरा विधानसभेसाठी येत्या गुरुवारी १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
