‘सीएनजी’वरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार
मुंबई, दि.२६: उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरचा मुल्यवर्धीत कर १३.५ टक्क्यांवरुन १ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली.
या अधिसूचनेनुसार दि. १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.