“‘लॉकडाऊन’ चा आदेश न पळणाऱ्यांना गोळ्या घाला” – वाचा कोण म्हणालय असं
जगभर कोरोनाचा दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. बाधित झालेल्या जवळपास सर्वच देशांनी लॉकडाऊन घोषित करून पंधरवडा उलटला. भारतासारखेच अनेक देशांतही बेजबाबदरीने वागणारे लोकं आहेत. फिलिपाईन्स चे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी लॉकडाऊन चा आदेश न मानणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले की आरोग्य विभागाचे कर्मचारी व डॉक्टरांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवू नये. त्यांना मारहाण करणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. यावर कठोर करवाई करण्याचा इशाराच त्यांनी फिलिपाईन्स वासीयांना दिला. फिलिपाईन्स मध्ये २३०० पेक्षा जास्त लोकं कोरोना बाधित असून आतापर्यंत ९६ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
