राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, मुंबईतील रुग्ण संख्या गेली ९१ वर
राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना ग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सध्या दिसत आहे. ही संख्या आता १७७ वर पोहोचली आहे. यात मुंबई सध्या आघाडीवर आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९१ झाली आहे.
याचसोबत देशभरात कॉरोनाग्रस्तांची संख्या ९०० वर गेली तर एकूण १९ रुग्ण दगावले आहेत.
महाराष्ट्रावर कोरोनाचं सावट आता गडद होताना दिसत आहे. याला आटोक्यात आणणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
