“जर मुंबई काही दिवस बंद ठेवली तर? कोरोना पासून बचावासाठी पंकजा मुंडे यांचा सल्ला
मुंबई: कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करत काही उपाय सुचवले आहेत. त्या म्हणाल्या की, “जर मुंबई पूर्ण बंद केली तर फायदा होईल का? जर हे पूर्वनियोजित पद्धतीने केलं तर लोकं घरी जीवनावश्यक सामान जमा करून ठेवतील. उपनगरीय रेल्वेही बंद ठेवली तर ७० लाख लोकांना व्हायरसचा प्रादुर्भाव होणार नाही.” पुढे त्या म्हणाल्या की दुकानही महत्वाच्या गोष्टींसाठी उघडी ठेवावीत विशेष म्हणजे ‘विंडो शॉपिंग’ बंद करावी.
Can Mumbai lock down help? if it's planned ppl can be prepared n stock things at home .local trains if closed for 7 days millions will be helped from exposure to the virus .stores can be opened for service but no window shopping only necessities made available ..Trying wil help!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 17, 2020
