नरेंद्र मेहतांवर कारवाई करा व त्यांच्या सर्व सुविधा बंद करा : आ. डॉ. मनीषा कायंदे यांची विधानपरिषदेत मागणी
मुंबई: भाजपचे मीरा-भाईंदर चे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविका नीला सोन्स यांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत थेट या प्रकरणी करण्यासाठी कोकण परिमंडळाच्या महानिरीक्षकांचे कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ बनवत सांगितले की नरेंद्र मेहता यांच्याकडून आपल्या व आपल्या मुलाच्या जीविताला धोका आहे. या प्रकरणी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही कारवाई करण्याची गळ घातली होती.
याच प्रकरणाचा धागा पकडत शिवसेना प्रवक्त्या व विधानपरिषद सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांनी विधिमंडळात आज काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर आजच्या आज पोलीस तक्रार दाखल करण्यात येईल का? असा पहिला प्रश्न केला तर माजी आमदार म्हणून मिळणारे निवृत्तिवेतन व इतर भत्ते थांबवता येतील का असा दुसरा प्रश्न केला. पुढे त्यांनी तिसऱ्या प्रश्नात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या डीवायएसपी राठोड व इतर पोलिसांना बडतर्फ करणार का? असा थेट सवाल विधानसभा अध्यक्षांना केला.
