मुंबईत कोरोना व्हायरसच्या एका संशयित रुग्णाला कस्तुरबा रूग्णालयात केलं दाखल
मुंबई: मुंबईत कोरोना व्हायरसच्या एका संशयित रुग्णाला कस्तुरबा रूग्णालयात दाखल केलं आहे. ताडदेवता रहिवाशी असणा-या या रुग्णाला कस्तुरबा रूग्णालयात कोरोना व्हायरस संदर्भात उभारलेल्या स्वतंत्र कक्षात ठेवलं आहे.
हा रुग्ण डाँक्टरांच्या निगराणीखाली असून तपासण्या सुरू आहेत. तपासण्यांचा अहवाल सायंकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. या रुग्णाला पाच दिवसांपासून खोकल्याचा त्रास जाणवत होता. शिवाय, काल तापही होता.
३ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत तो चीनमध्ये होता. त्याच्यावर कोरोना संदर्भातल्या लक्षणांबाबत उपचार सुरु आहेत.
