मोठी बातमी# आरे आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाबाहेर पत्रकारांशी केलेल्या वार्तालापतील महत्वाचे मुद्दे
# ज्या पर्यावरण प्रेमींवर गुन्हे दाखल झाले होते ते सर्व गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत.
# आज विधानसभा अध्यक्षांची निवड होती. आता आम्ही मोकळे झालेलो आहोत. आता पुढील कामे ही जोमाने करू.
# राज्याची नेमकी परिस्थिती काय आहे त्याचे अवलोकन करत आहोत.
# मी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिलेली नाही. विकासाच्या कोणत्याही कामाला मी स्थगिती दिलेली नाही.
# शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या सर्व केल्याशिवाय मी राहणार नाही.
# खाते वाटप देखील लवकरच करण्यात येईल.
# राज्याची विकास कामे थांबत नाही आहेत.
