नमुंमपा क्षेत्रात वृक्ष तोडणे अथवा स्थलांतरित करणेच्या परवानगीकरिता वृक्षसंगोपन तज्ज्ञ (Arborist), बागकामतज्ज्ञ (Horticulturist) या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक
नवी मुंबईतील वृक्षसंपदा जतन व रक्षणाकरिता महत्वाचे पाऊल
नवी मुंबई, दि. २९: महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संवर्धन आणि संवर्धन अधिनियम 1975 (The Maharashtra (Urban Area) Protection and Preservation of tree Act 1975) अन्वये महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षांचे संवर्धन, संरक्षण व जतन करणे, कर्तव्य ही वृक्ष प्राधिकरणाची मुख्य जबाबदारी आहे. याबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांचे शासन परिपत्रक, क्र. वृक्षक 2021/प्र.क्र.26/तां.क्र.4, दिनांक 24 जून 2021 अन्वये स्थानिक वृक्ष प्राधिकरणाच्या कर्तव्यांमध्ये या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा सल्ला व मार्गदर्शन घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी, सार्वजनिक ठिकाणावरील वृक्ष तोडणे अथवा स्थलांतरित करणेकरिता वृक्षसंगोपन तज्ज्ञ (Arborist), बागकामतज्ज्ञ (Horticulturist) या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची नेमणूक करणेत आलेली आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोणतेही वृक्ष विनाकारण तोडले जाणार नाहीत.
या अनुषंगाने विकास कामामध्ये येणा-या किंवा धोकादायक वाटणाऱ्या प्रत्येक झाडाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वृक्ष आहे त्याच जागी ठेवून वाचविणे शक्य असल्यास त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. तसेच सदर वृक्ष बाधित होणार असल्यास त्या वृक्षाचे इतर ठिकाणी स्थलांतर करताना शास्त्रीय पध्दतीने पुनर्रोपण करण्यात येईल.
त्याचप्रमाणे काही वृक्षावर कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येणार आहे. या वृक्षांची तपासणी करताना रजिस्ट्रोग्राफ (Registrograph) सारख्या अत्याधुनिक उपकरणांचाही वापर करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने याकामी नेमणूक केलेल्या वृक्षसंगोपन तज्ज्ञ (Arborist), बागकामतज्ज्ञ (Horticulturist) क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींमध्ये –
(1) असिम गोकर्ण हरवंश (कार्यालय : 307, 3 रा मजला, बी विंग, द ग्रेट ईस्टर्न – सुमीत, से-15, सी.बी.डी. बेलापूर नवी मुंबई – 400614 / भ्र.क्र. 9820175988),
(2) नकुल सवानी (कार्यालय : 9, पावापुरी अपार्टमेंन्ट, 9th खेतवाडी लेन, मुंबई – 400004 / ई मेल – nakul.savani@gmail.com / भ्र.क्र. 9820175248),
(3) गौरवी गोपाळ ठसाळे (कार्यालय : ग्रीन इको लँडस्केप अँड ॲग्रो सर्व्हिसेस, फ्लॅट नं-707, सी विंग, साई सृष्टी वाटिका, खार्डीगाव, दवाले, दिवा ईस्ट / ई मेल – gauravithasale66@gmail.com / भ्र.क्र. 9011620767,
(4) ऋतिक मुरुडकर (कार्यालय : नेचर इनटॅक्ट प्रा.लि., शॉप नं-318, काळुबाई दर्शन, निळजे गाव, डोंबिवली / ई मेल-hritk@natureintact.in /भ्र.क्र. 7972946543/ 7977158577
(5) वैभव राजे (कार्यालय : 606, शांतीवन, 1/बी, रहेजा टाऊनशीप, दिंडोशी पोलीस स्टेशनजवळ, मालाड (पूर्व), मुंबई – 97
अशाप्रकारे ५ तज्ज्ञांचा समावेश आहे. यामुळे खाजगी क्षेत्रातील वृक्ष तोडण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांनासुध्दा या वृक्षसंगोपन तज्ज्ञ (Arborist), बागकामतज्ज्ञ (Horticulturist) क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेता येणार आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागाने केलेल्या या तज्ज्ञांच्या नेमणूका नवी मुंबईतील वृक्षसंपदा रक्षण व जतन करण्यासाठी महत्वाच्या आहेत.
