जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ऐरोली येथे वृक्षारोपण मोहीम संपन्न
नवी मुंबई, दि. ५: देशी झाडांच्या वृक्षारोपणातून आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिन संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असताना ऐरोली विभागातही लोकसहभागातून देशी वृक्षलागवड करण्यात आली. यामध्ये ऐरोली विभागाचे सहा. आयुक्त अशोक आहिरे तसेच कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, उपअभियंता गजानन पुरी व बंधु शिरोसे, उप मुख्य स्वच्छता अधिकारी राजेद्र इंगळे, उद्यान सहाय्यक पुनम नवले तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत ऐरोली विभाग कार्यालय परिसरात कडूनिंबांची झाडे लावण्यात आली.
त्याचप्रमाणे ऐरोली, से-१८ येथील रामदास बापु पाटील उदयानात ज्येष्ठ नागरिक संघटना, ब्रम्हकुमारी संस्था यांच्या सहयोगाने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. ऐरोली सेक्टर – ये१४थील नमुंमपा शाळा मैदानात शालेय विदयार्थी तसेच सामाजिक पर्यावरणप्रेमी आणि सखी महिला यांच्या सहयोगाने कडुनिंबाची ५० वृक्षरोपे लावण्यात आली.
पटनी रोड येथेही नेवा गार्डन सोसायटीपासून दिघ्याकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला १०० नग कडूनिंबच्या झाडांचे मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या सहभागातून वृक्षरोपण करण्यात आले. या सर्वच ठिकाणी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण रक्षण व संवर्धनाची शपथ ग्रहण करण्यात आली.
