तिबेट निर्वासित संसदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट
मुंबई, दि. २२ : तिबेटच्या १७ व्या निर्वासित संसदेच्या (TPiE) तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी गेशे ल्हारामपा अटुक त्सेटन, धोंडुप ताशी व त्सेरिंग यांगचेन उपस्थित होते.
