बंदी असलेल्या नायलॉन मंजावर अमलबजावणी बाबत चर्चा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे कार्यशाळेच आयोजन
नागपूर, दि. ८: नायलॉन मांजाने आजपर्यंत शेकडो बळी घेतले अनेकांना जखमी व पक्ष्यांचा सुद्धा बळी घेतला आहे. बंदी असलेल्या नायलॉन मंजावर अमलबजावणी बाबत चर्चा, इकोब्रिक्स प्रशिक्षण व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेच आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस उपायुक्त अर्चित चांडक, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, नागपूर@२०२५ चे समन्वयक निमेश सुतारीया, जुही सहस्रबुद्धे यांचासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी, मनपा आणि जिल्हापरिषदेच्या सर्व शाळांचे मुख्यध्यापक, शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी हजारोंच्या संख्येत नागरिकांनी नायलॉन मांजा मुक्त नागपूरची प्रतिज्ञा घेतली.
