नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावरील आकर्षक रोषणाई ठरत आहे आकर्षणाचा केंद्र बिंदू
नवी मुंबई, दि. ०१: नवी मुंबई महानगरपालिकेच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त आणि नूतन वर्षानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पाम बीच मार्ग तसेच उरण जेएनपीटी मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहन चालक-प्रवासी-नागरिकांसाठी हि रोषणाई आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे.
काल ३१ डिसेंबर, २०२३ रोजी मध्यरात्री १२ वाजता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीवर नवीन वर्षाच्या स्वागताकरिता COUNTDOWN सहित नेत्रदीपक अश्या लाईट्स, लेझर आणि SFX शो चे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच, सदर विद्युत रोषणाई आपणास ३० डिसेंबर, २०२३ ते १ जानेवारी, २०२४ या कालावधीत सायंकाळी ७ ते मध्यरात्री १२ पर्यंत पाहता येईल.
