ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पीआरएस ओबेरॉय यांचं निधन
मुंबई, दि. १४: ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंग ओबेरॉय (पीआरएस ओबेरॉय) यांचं आज दिल्लीत निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी देशात हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘द ओबेरॉय ग्रुप’चे संस्थापक राय बहादूर मोहन सिंग ओबेरॉय त्यांचे वडील होते. ब्रिटन आणि स्वित्झर्लंडमधे उच्च शिक्षण झाल्यानंतर त्यांनी या उद्योगाची सूत्रं सांभाळली. भारतातल्या हॉटेल व्यवसायाचा चेहरामोहरा बदलण्याचं श्रेय पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांना जातं. ओबेरॉय यांनी २०२२ मध्ये EIH लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे अध्यक्षपद सोडलं. २००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ओबेरॉय यांच्या पार्थिवावर कपाशेरा इथल्या त्यांच्या शेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Source – AIR
