पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
नवी मुंबई, दि. ७: सोमवार दि. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचेमार्फत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील 100/22 KV सबस्टेशन देखभाल – दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात सोमवार, दि. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजता या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणीपुरवठा देखील बंद राहील. तसेच मंगळवार दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी नियमित दाबाने पाणीपुरवठा होईल. याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.
