‘पीएफआय’ शी संबंध असल्याच्या संशयावरुन ‘एनआयए’चे देशभरातील १४ ठिकाणी छापे
मुंबई, दि. १३: दि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कारवायांना लगाम लावण्यासाठी ‘एनआयए’ अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कोल्हापूर, मालेगावसह देशातल्या एकूण १४ ठिकाणी आज छापे टाकले. देशातली शांतता आणि धार्मिक सौहार्दात बाधा आणणारं साहित्य यावेळी जप्त करण्यात आलं. मालेगावातल्या एका व्यक्तीला भावासह एनआयएच्या मुंबई कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं असल्याचं वृत्त आहे.
यापूर्वीच मालेगावातले दोघे ‘एनआयए’च्या ताब्यात आहेत. ‘एनआयए’ने आज कोल्हापूर, कर्नाटकातला दक्षिण कन्नड, केरळमधला कन्नूर आणि मल्लापुरम, उत्तर प्रदेशातला मुर्शिदाबाद आणि बिहारमधल्या कटीहार या जिल्ह्यातही छापे टाकले. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गेल्यावर्षी एप्रिलमध्ये पीएफआयविरुद्ध गुन्हा नोंदवला होता आणि त्यानंतर त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांना अटक केली होती.
Source – AIR
