तणावमुक्त पद्धतीने ई-वाहनांकडे वळण्याचा प्रयत्नासह ग्राहकांना खरेदीसाठी सहजता उपलब्ध होणार
मुंबई, दि. १५: अथर एनर्जी ही भारतात इलेक्ट्रिक स्कूटर निर्माण करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असून, आता कंपनीने बजाज फ़िन्सर्व लिमिटेडचा भाग असलेल्या बजाज फ़ायनान्स लिमिटेड (BFL) सह भागीदारी करत ग्राहकांना दुचाकी ई-वाहन खरेदीकरिता आर्थिक पर्याय उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ई-वाहनांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येते आहे. या भागीदारीमुळे भारतातील अग्रगण आणि विविधता असलेल्या आर्थिक सेवा प्रदान करणाऱ्या समूहासह अथर एनर्जी एकत्र येऊन बजाजच्या भारतातील सखोल अशा फ़ैलावाचा लाभ घेत ई-वाहने ग्राहकांना विकत घेण्याकरिता अधिक सहज आणि परवडणारी बनविण्याचा प्रयत्न करणार आहे.
बजाज फ़ायनान्स ही तांत्रिकतेवर जोर देणारी NBFC असून ग्राहकांचा डिजिटल अनुभव सुधारावा यावर लक्ष केंद्रित करत व्यापक असे आर्थिक पर्याय त्यांच्या समोर ठेवते. या भागीदारीचा हेतू देखील ग्राहकांची सहजता सुधारण्यासह उद्योगाच्या दृष्टीने ई-वाहनांच्या आर्थिकतेमध्ये वाढ करण्याचा आहे. भारतामध्ये ई-वाहन पोषक प्रणाली निर्माण होत असताना, अथरच्या उत्पादांनी देशातील महत्वाच्या आर्थिक संस्थांसह एकत्र येत ई-वाहनाकडे वळू इच्छिणाऱ्या ग्राहकांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

या भागीदारी बद्दल बोलताना अथर एनर्जीचे प्रमुख व्यवसाय अधिकारी असलेले रवनीत फ़ोकेला म्हणाले, “भारतीय ई-वाहन उद्योगातील प्रवर्तक असलेल्या आम्हाला असा विश्वास आहे, की आमची जबाबदारी म्हणून आम्ही ई-वाहन ग्राहकांना खरेदीमध्ये सहजताने उपलब्ध करून द्यावी. आमच्या ग्राहकांना आर्थिकतेमध्ये उत्तम पर्याय मिळावे म्हणून, अथर मजबूत अशा आर्थिक संस्थांसह एकत्र येऊन काम करित आहे आणि भविष्यात देखील हे कार्य असेच सुरू राहील. बजाज फ़ायनान्स ही भारतातील एक अग्रगण्य आर्थिक मदत देणारी कंपनी असून त्यांचा पोर्टफ़ोलियो हा विविधतांसह तयार केला गेला आहे ज्यामुळे आमच्या ग्राहकांना सहजतेचा अनुभव मिळेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये ई-वाहनांकडे वळण्याचा ते विचार करतील.”
बजाज फ़ायनान्ससह, अथर ग्राहकांना १००% ऑन-रोड फ़ंडिगची सुविधा दिली जाईल आणि नव्या ग्राहकांना देखील ५ मिनिटापेक्षा कमी कालावधीमध्ये ईएमआय मंजूरी दिली जाईल
बजाज फ़ायनान्स लिमिटेड (BFL) कडे ७ कोटी ग्राहकांची मजबूत अशी उपलब्धी असून, अथर याचा लाभ घेत ब्रॅन्ड आणि ई-वाहन उद्योग दोन्हीकरता विकासाच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. बजाज फ़ायनान्स लिमिटेड सह अथर ग्राहकांना ऑन-रोड फ़ंडिंगकरता १००% मदत मिळणार आहे आणि नवीन ग्राहकांना ५ मिनिटांपेक्षा देखील कमी कालावधीमध्ये ईएमआय मंजूरी मिळू शकेल, जो सध्या या उद्योगातील सर्वात जलद असा टर्न-अराउंड–टाईम असेल.

बजाज फ़ायनान्स लिमिटेडच्या, वैयक्तिक कर्ज आणि विक्री आर्थिकतेचे अध्यक्ष असलेले अमित रघुवंशी यावेळेला बोलताना म्हणाले, “आम्हाला अथर एनर्जीसह भागीदारी करताना अतिशय आनंद होत असून बजाज फ़ायनान्सच्या संपूर्ण भारतातील अस्तित्वामुळे अथर एनर्जीच्या विस्ताराचे नियोजन उत्तम पद्धतीने राबविले जाईल. एकमेकांना उत्तम साथ देत आम्ही संपूर्ण भारतातील ग्राहकांना नक्कीच लाभदायी ठरतील अशा सेवा प्रदान करू. बजाज फ़ायनान्सच्या एकूणच एन्ड- टू- एन्ड डिजिटल प्रवासामुळे त्वरीत डिस्बर्समेंट देता येतात, ज्यामुळे अथर आपल्या ग्राहकांना कटकटमुक्त अशी कर्ज उपलब्ध करून देईल आणि त्यांना एक चांगला आर्थिक अनुभव देखील मिळेल.”
या भागीदारीच्या माध्यमातून ६० महिन्यांच्या कालावधी पर्यंत कर्ज मिळू शकेल, ज्यामुळे मासिक ईएमआय हा भारतीय चलनानुसार फ़क्त रू. २९९९ एवढा पडेल
डिसेंबर २०२२ मध्ये, अथर एनर्जी ही पहिली अशी EV OEM (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफ़ॅक्चरर) कंपनी ठरली, ज्यांनी ४८ महिन्यांच्या कालावधीमध्ये आपली उत्पादने बाजारात आणली. ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद देखील उत्तम होता, ते ई-वाहने खरेदीसाठी तयार होते. या यशामुळे, अथर एनर्जी आणि बजाज फ़ायनान्स ६० महिन्यांच्या कालावधीची उत्पादने बाजारात येणार आहेत, असे केल्याने ग्राहकांचा ईएमआय हा भारतीय चलनानुसार रू. २९९९ होऊ शकेल, आणि त्यांना लवचिकतेसह परवडू शकेल असे पर्याय मिळतील.
