महापालिकेकडून आता मुंबईतील सहा चौपाट्यांवर २ पाळ्यांमध्ये प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची होणार नेमणूक
मुंबई, दि. १५: मुंबईत समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतल्या सहा चौपाट्यांवर, प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाट्यांवर सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तर, दुपारी ३ ते रात्री ११ दरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात असतील. मुंबईत जुहू चौपाटीवर नुकत्याच झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Source – AIR
