या डाक अदालत मध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातील टपाल सेवेशी संबंधित तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करण्यावर भर
मुंबई, दि. १९: २० जून २०२३ रोजी दुपारी तीन वाजता मुंबई येथे महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल १२३ वी डाक अदालत आयोजित करणार आहेत. ही बैठक ॲनेक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, ५ वा मजला, मुंबई – ४००००१ येथे होईल. या डाक अदालत मध्ये ज्यांचे पाच आठवड्यांच्या कालावधीत निराकरण झाले नाही अशा महाराष्ट्र आणि गोव्यातील टपाल सेवेशी संबंधित तक्रारींचे आणि समस्यांचे निराकरण करण्यावर भर राहील.
आपल्या देशाच्या सामाजिक आर्थिक जडणघडणीत टपाल सेवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात तसेच प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणामही करतात. आपल्या ग्राहकांना अत्यंत समाधानकारक सेवा देण्याचा टपाल विभाग प्रयत्न करत असताना देखील संप्रेषणातील अंतर आणि सेवेतील त्रुटींमुळे अधूनमधून तक्रारी आणि समस्या येऊ शकतात. या समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून १२३वी मंडळस्तरीय डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
या डाक अदालत मध्ये ज्यांचे पाच आठवड्यांच्या कालावधीत निराकरण झाले नाही अशा महाराष्ट्र आणि गोव्यातील टपाल सेवेशी संबंधित तक्रारींचे आणि समस्यांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करेल. ही अदालत विशेषत: अनोंदणीकृत/नोंदणीकृत पत्र, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डर न भरण्याबाबतच्या तक्रारींचा विचार करेल. त्वरीत निराकरण करण्यासाठी, तक्रारकर्त्यांना मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती त्यांची नावे आणि पदांसह तपशीलवार माहिती, तसेच वस्तू, मनी ऑर्डर, बचत बँक खाती, प्रमाणपत्रे इत्यादींची तपशीलवार माहिती प्रदान करण्याची विनंती करण्यात आली आहे.
डाक अदालतमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी सहाय्यक संचालक टपाल सेवा आणि डाक अदालत सचिव यांच्याकडे दोन प्रतिच्या रुपात खालील पत्त्यावर सादर कराव्यात: मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, ॲनेक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, ४ था मजला, मुंबई – ४००००१. या तक्रारी ५ जून २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचल्या पाहिजेत.
