हवाई दलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ, तपास सुरु
राजस्थानमधील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी आणि पुढील तपास करण्यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेला पुलवामा दहशतवादी हल्ला, त्यानंतर हवाई दलाने एअर स्ट्राईक करत केलेली कामगिरी, यामुळे भारत -पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लष्कराच्या छावण्या, हवाई-नौदलाचे तळ यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न दहशतवादी आणि पाकिस्तान करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. त्यामुळे भारतातील महत्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे.
