DHFL – येस बँक घोटाळ्याप्रकरणी केली अटक
मुंबई: बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले याला सीबीआयनं आज मुंबईत अटक केली आहे. येस बँक-DHFL घोटाळा प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईतले बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांना सीबीआयनं अटक केलेली आहे. वाधवा बंधूशी संगनमत करुन भोसलेनं येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा पैसा विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करुन अखेर DHFL ला दिला असा संशय सीबीआयला आहे. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून उद्या त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
