CIDCO Logo 600x460
“रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के योजनेंतर्गत सिडकोचा भूखंड” – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: रायगड जिल्ह्यातील दत्तू ठाकूर व इतर यांची जमीन नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली असून यापैकी काही हेक्टर क्षेत्र १२.५ टक्के योजनेंतर्गत भूखंड वाटपासाठी पात्र आहे. या पात्र क्षेत्रासाठी १ हजार चौरस मीटरचा भूखंड देय असून त्यांना द्रोणागिरी नोड येथे ३०० चौरस मीटरचे भूखंड वाटप करून उर्वरित ७०० चौरस मीटरचे भूखंड संभाव्य सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यातील प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींना १२.५ टक्के योजनेचा लाभ देण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.
