मुंबई-पुणे एक्स्प्रेस आज दोन तासांसाठी बंद
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कमान बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने या मार्गावरील मुंबईकडे येणारी एक मार्गिका आज (गुरुवारी) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत ही वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.
प्रवाशांना खालापूर टोल नाक्यापासून खालापूर गाव-खालापूर फाटा-चौक फाटा-दौंड फाटा-शेडुंग टोल-आजिवली फाटा या मार्गे पुन्हा ‘एक्स्प्रेस वे’वर जाता येईल. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी या वाहतूक बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक विजय पाटील यांनी केले आहे.
