युक्रेनमध्ये झॅप्रोझेझिया इथल्या अण्विक उर्जा प्रकल्पाला लागलेली आग सध्या नियंत्रणात
युक्रेनमध्ये झॅप्रोझेझिया इथल्या अण्विक उर्जा प्रकल्पाला लागलेली आग आटोक्यात आल्याचं युक्रेनच्या आपातकालीन प्रशासनानं कळवलं आहे. समाज माध्यमाधवर या बाबतची माहिती देण्यात आली.
आगीचं वृत्त कळाल्यानंतर पहाटे पासून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जवळपास एक तास अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. आता हा प्रकल्प सुरक्षित असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. या प्रकल्पाच्या मागच्या बाजुला असलेल्या किरणोत्सवावर परिणाम झालेला नाही, असं प्रकल्पाच्या प्रवक्त्यांनी कळवलं आहे. या प्रकल्पाबाबत आंतरराष्ट्रीय आण्विक उर्जा संस्थेचे तज्ञ युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं या प्रवक्त्यांन सांगितलं.
