दुकानांवर मराठीत पाट्या लावण्याच्या निर्णयाविरोधातली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली
मुंबई: मुंबईसह राज्यातल्या सर्व दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल झालेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. तसंच ही याचिका दाखल करणाऱ्या संघटनेला २५ हजारांचा दंड ठोठावला.
दंडाची रक्कम आठवड्याभरात मुख्यमंत्री मदतनिधीत जमा करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर काल सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा आदेश दिला.
Source-AIR
