उरण न.प. चे लेखाधिकारी सुरेश पोसतांडेल यांची कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड
उरण दि.१(विठ्ठल ममताबादे): कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे काम करणारे, स्वच्छ चारित्र्य संपन्न कर्मचारी म्हणून सर्वत्र सुरेश पोसतांडेल यांची ओळख असून सुरेश पोसतांडेल हे उरण नगर परिषद येथे लेखाधिकारी पदावर काम करीत आहेत. ते नगर परिषद/नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे काम करत असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची निवड महाराष्ट्र राज्य नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी करण्यात आली आहे.
दिनांक ३१/१०/२०२१ रोजी शेगाव येथे झालेल्या सभासदांच्या सर्वसाधारण सभेत कर्तव्य दक्ष कर्मचारी सुरेश पोसतांडेल यांची महाराष्ट्र नगर परिषद/नगर पंचायती कर्मचारी/संवर्ग कर्मचारी या शासन मान्यताप्राप्त संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. तसेच प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रदीप रावनकर, प्रदेश सरचिटणीस पदी रामेश्वर वाघमारे व प्रदेश कोषाध्यक्ष म्हणून अनिल पवार यांची नेमणूक झाली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत मधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन होत आहे. अनेक जणांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तर काही जणांनी त्यांना समाज मध्यमाद्वारे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
