अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांतातील संघर्षामध्ये सुमारे ६०० तालिबानी ठार
अफगाणिस्तानमध्ये, ईशान्येकडील पंजशीर प्रांतात चालू असलेल्या संघर्षामध्ये सुमारे ६०० तालिबानी मारले गेले आहेत. अफगाण प्रतिकार फौजांनी सांगितलं की १ हजारहून अधिक तलिबानी पकडण्यात आले किंवा त्यांना स्वतः शरणागती पत्करली आहे. अन्य अफगाणी प्रांतांमधून रसद मिळण्यातही तालिबानला अडचणी येत आहेत. पंजशीर प्रांतात भूसुरुंग पेरलेले असल्यामुळं त्यांच्या आक्रमणाची धार बोथट झाली आहे. पंजशीर प्रांत हा अहमद मसूद याच्या नेतृत्वातील नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटचा बालेकिल्ला आहे.
Source – AIR
