“शंभर टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा” – गृहमंत्री अमित शहा
देशात शंभर टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. गांधीनगरमध्ये कोरोना काळात विविध प्रकारे मदत करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.शंभर टक्के लसीकरणाबरोबरच, गरजू व्यक्तींना 5 किलो धान्य पुरवण्यासाठी जाहीर झालेली पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनाही योग्य व्यक्तींपर्यंत पोहचण्यासाठी युवकांनी मदत करावी, असं शहा म्हणाले. कोरोनाशी लढा देताना जनतेनं मोठं धाडस दाखवलं असून भविष्यातही त्याची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान देशात कोरोना लसीकरणात भारतानं 38 कोटींचा टप्पा पर केला आहे. आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधक लशीच्या 38 कोटी 14 लाख 67 हजार 646 मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 40 लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली.
