उद्या ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
मुंबई, दि.२८: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी, उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे समन्स बजावलं आहे. याआधी शनिवारी देशमुख यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं, मात्र त्यांनी वकिलांमार्फत वेळ मागून घेतली होती.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरूद्ध शंभर कोटीं रुपयांच्या खंडणीची तक्रार केली होती. या प्रकरणानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये चौकशी सुरू आहे. देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांना ईडीने अटक केली असून, न्यायालयाने त्यांना एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
