अमेरिकेत १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ‘फायझर’ च्या कोविड प्रतिबंधक लसीला मंजुरी
फायझर ही बायोएनटेकची कोविडवरील लस १२ ते १५ वयोगटातील मुलांना देण्यास अमेरिकेच्या सरकारने मंजूरी दिली आहे.
लस सल्लागार समितीने १२ ते १५ वयोगटातल्या मुलांना लसीच्या दोन मात्रा देण्याबाबत शिफारस केल्यानंतर तिथल्या अन्न आणि औषध प्रशासनाने या लसीचा आपत्कालीन वापर लगेचच सुरू करण्याची मंजूरी दिली.
आज याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.
