वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरमध्ये १३ जूनपर्यंत लॉकडाऊन
सिंगापूर: एक प्रमुख जागतिक बाजारपेठे व वित्तीय केंद्र असलेल्या सिंगापूरमध्ये कोविड बाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याने तिथं पुन्हा एकदा टाळेबंदी सदृश स्थितीत निर्माण होत आहे. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानं निवेदन जारी करत उद्यापासून १३ जूनपर्यंत नवीन निर्बध जाहीर केले आहेत. यानुसार, उपाहारगृहे बंद करण्याबरोबरच दोनपेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
या आधी ५ लोकांना एकत्र भेटण्यास परवानगी होती. तसेच घरकामासाठी दोनपेक्षा अधिक लोकाना घरात घ्यायला मनाई केली आहे. घरून काम करणे अनिवार्य असेल तसेच उपहारागृहातून केवळ पार्सल सेवेला परवानगी देण्यात आली आहे. नव्या नियमांची घोषणा झाल्यानंतर सिंगापूर डॉलरच्या किमतीतली घसरण चालूच राहिली.
