“लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार करा” – राहुल गांधी यांची केंद्र सरकारला सूचना
नवी दिल्ली, दि.७: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांना निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार करावा, अशी सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केली आहे. यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज पत्र लिहिलं आहे.
कोरोनाच्या या भयंकर साथीविरोधात एकत्रित लढा देण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व संबंधितांना विश्वासात घ्यावं असं या पत्रात म्हटलं आहे.
लॉकडाऊनच्या आर्थिक परिणामांबद्दल चिंता आहेच. पण या महामारिचे परिणाम आर्थिक हानीपेक्षा जास्त वाईट असतील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
