कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे आयसीयु बेड वाढवाण्याचा मुंबई महानगरपालिकेचा निर्णय
मुंबई, दि.४: मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयु बेड अपुरे पडू लागले, रुग्णांची गैरसोय झाली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अशा समस्या समस्या येऊ नयेत यासाठी मुंबई महानगरपालिकेने आयसीयु बेड वाढवायचा निर्णय घेतला आहे.
येत्या काही दिवसांत पालिका विविध रुग्णालयं आणि कोविड केंद्रांमध्ये आयसीयुच्या ३०० खाटा वाढवणार आहे.
पालिकेने आयसीयू बेडची संख्या वाढवून २ हजार ९०६ आणि व्हेंटिलेटर बेडची संख्या १ हजार ४९१ केली आहे.
यानंतरही रुग्णांना आयसीयु बेड मिळण्यात अडचणी येत आहेत. हे लक्षात घेता, येत्या काही दिवसांत विविध रुग्णालयांमध्ये या आयसीयु बेडची अंमलबजावणी करणार असल्याचं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.
Source – AIR
