‘१०० कोटी’ प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या FIR विरोधात अनिल देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
मुंबई, दि.४: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या FIR विरोधात देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई पोलीसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाच्या सहाय्यानं शहरातल्या बार आणि रेस्टॉरंट्स कडून खंडणी उकळण्याचा आरोप CBIनं देशमुख यांच्याविरुद्धच्या FIR मध्ये केला आहे.
CBI कडून कारवाईपासून संरक्षण द्यावं, अशी विनंती देशमुख यांनी उच्च न्यायालयाला केली आहे.
