१८ वर्षांवरील कोविड लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर एका दिवसात ८० लाखांहून अधिकांनी केली नोंदणी
मुंबई, दि.२९: देशात अठरा वर्षांवरील सर्वांचं कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी कालपासून नोंदणी सुरु झाल्यानंतर कोविन(Cowin) पोर्टलवर ८० लाखांहून अधिक लोकांनी काल अवघ्या तीन तासात नोंदणी केली आहे.
या दरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही असं आरोग्य मंत्रालयानं सांगितले.
येत्या १ मे पासून देशात १८ ते ४४ वर्षांच्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू होणार आहे.
