‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाबाबत ‘ती’ अफवाच
सीबीएसई च्या १०वी च्या समाजशास्त्र विषयाच्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणखी कमी केला असल्याची माहिती समाज माध्यमांमधून पसरत असून ती खोटी असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.
अभ्यासक्रम आणखी कमी केल्याचं सीबीएसईनं जाहीर केलं नसल्याचं प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोनं सांगितलं आहे.
