‘कोव्हॅक्सिन’ लस कोरोनाच्या नवीन प्रकारावरही तितकीच प्रभावी – आय.सी.एम.आर(ICMR)
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि भारत बायोटेक यांनी मिळुन विकसित केलेली कोरोना विरोधी लस ‘कोव्हॅक्सिन’ यु. के. मध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकारावरही तितकीच प्रभावी असल्याचं आय. सी. एम. आर. ने म्हटलं आहे.
राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये याबाबतचं संशोधन झालं असल्याचंही आय.सी.एम.आर.(ICMR) नं म्हटलं आहे.
