Sundar Pichai at BMC School
सुंदर पिचाईंची मुंबईतील पालिका शाळेत अचानक एन्ट्री ….विद्यार्थी-शिक्षक चकित
मुंबई : त्याचं झालं असं कि ‘गुगल’ या जगातल्या सर्वात मोठ्या सर्च इंजिन चे सी.ई.ओ. सुंदर पिचई यांच्या हस्ते पिरामल फाऊंडेशन आणि गूगलतर्फे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘बोलो ऍप’ चे काल अनावरण करण्यात आले. पिचईंची हि अचानक भेट सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच अधिकाऱ्यांसाठी आश्चर्याचा धक्का होती. गेल्याचा आठवड्यात गूगल तर्फे हे ऍप भारतात लाँच करण्यात आले होते. ‘बोलो’ एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ज्याला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेले रीडिंग टयुटर ऍप आहे. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद पाहण्याची संधी मला मिळाली असे त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये नमूद केले आहे. हा कार्यक्रम डी. एन. नगर येथील मुंबई महापालिकेच्या मराठी शाळेत घेण्यात आला. त्यांनतर सुंदर पिचाई यांनी ‘गुगल इंडिया’ ने आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमस्थळी प्रयाण केले.
