मुंबईतील महिला व वकील संघटनांकडून शक्ती कायद्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना
या बैठकीस उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, अपर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे तसेच विधिमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत व इतर सदस्य उपस्थित होते.
मुंबईतील जवळपास ४६ महिला व वकील संघटनांकडून सूचना, निवेदने प्राप्त झाली होती. त्यांच्या प्रतिनिधींनी समितीसमोर सूचना मांडल्या. या समितीची पुढील बैठक औरंगाबाद येथे दि. ३० जानेवारी, २०२१ रोजी होणार असून त्याठिकाणीदेखील महिला व वकील संघटनांकडून सूचना व निवेदने स्वीकारली जाणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
