ग्रामीण गुजरातमध्ये घडून आलेले परिवर्तन प्रत्येकाने पाहण्यासारखे: पंतप्रधान
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याचे आणि सूरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीव्दारे झालेल्या या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल, केंद्रीय गृह मंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री उपस्थित होते.
Towards prosperous urban centres in Gujarat. #GujaratMetroRevolution https://t.co/bQH5rM33eU
— Narendra Modi (@narendramodi) January 18, 2021
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी अहमदाबाद आणि सूरत शहरांना मेट्रोची भेट मिळत असल्याबद्दल लोकांचे अभिनंदन केले. व्यावसायिक दृष्टीने दोन्ही शहरे महत्वाची असल्यामुळे तिथली संपर्क व्यवस्था मेट्रो सुविधेमुळे अधिक कार्यक्षम बनण्यास मदत होणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अहमदाबाद ते केवडिया या मार्गावर आधुनिक जनशताब्दीच्या सुविधेसह आणखीही नवीन गाड्यांची सोय झाल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले. आज 17 हजार कोटींच्या प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहेत, यावरूनच कोरोना कालावधीतही पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामांनी चांगलाच वेग पकडला आहे, हे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात हजारों कोटींचे प्रकल्प देशाला समर्पित करण्यात आले तसेच नवीन प्रकल्पांचेही काम सुरू झाले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
