कोविड-१९ वरच्या लसींबाबतचा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवारी तीन शहरांच्या भेटीवर
पुणे: कोविड-१९ वरची लस विकसित करण्याच्या तसंच तिचं उत्पादन करण्याच्या प्रक्रियेचा व्यक्तिशः आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन शहरांना भेटी देणार आहेत.
त्यात अहमदाबाद इथं झायडस बायोटेक पार्क, पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट आणि हेद्राबाद इथं भारत बायोटेक या तीन ठिकाणी लस संशोधन कार्याची पाहणी ते करणार आहेत.
तिथल्या शास्त्रज्ञांशी चर्चा करुन पूर्वतयारी, आव्हानं तसंच नागरिकांना ही लस देण्याबाबतच्या आराखड्याची थेट माहिती प्रधानमंत्री स्वतः घेणार असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाच्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
