बिहारचे ३७वे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा शपथविधी संपन्न
पाटणा, दि.१६: बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी आज सायंकाळी शपथ घेतली. यावेळी ‘रालोआ’ च्या एकूण १३ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
काल रालोआच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नितीशकुमार यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्यासह सर्व आमदारांनी राज्यपाल फागु चौहान यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता.
